
दिवाळी फराळासाठी आवश्यक पाच वस्तू मिळणार अल्प किंमतीत…
राजापूर तालुका गुरव ज्ञाती समाजाचा “चला गोड करूया दिवाळी” उपक्रम
राजापूर : राजापूर तालुका गुरव ज्ञाती समाजाच्या वतीने “चला गोड करूया दिवाळी” या उपक्रमांतंर्गत दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच वस्तू कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
राजापूर तालुका गुरव ज्ञाती समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचे सर्वांकडून विशेष कौतुक केले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा लोक आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी करताना दिसतात. त्याप्रमाणे इतरांनाही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करता यावी, त्यांच्याही घरचा दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा या उद्देशाने हा नाविणन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये फराळासाठी आवश्यक असलेल्या रवा, मैदा, साखर, पोहे, चनाडाळ प्रत्येकी एक किलो अशा बाजारभावाप्रमाणे २८५ रूपयांच्या पाच वस्तू केवळ १८५ रूपयांमध्ये गुरव ज्ञाती समाजाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे वाटप १५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता आंबेडकर भवन येथील भाजपा कार्यालयात करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा केवळे कॅशरी व पिवळे कार्डधारकांसाठी दिला जाणार आहे. याची नावनोंदणी विवेक गुरव मोबा (८५५४०८९२६७) यांच्याकडे केली जाणार आहे.
विवेक (पिंट्या) गुरव आणि सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी तेजस गुरव, प्रभाकर गुरव, भरत गुरव, गजानन गुरव, आदीं मेहनत घेत आहेत. तरी या मंडळाच्यावतीने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.




