
कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणारी उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक २९ रोजी यार्डात विसावणार.
शिमगोत्सवात २ मार्चपासून वसईमार्गे कोकण मार्गावर चालवण्यात येत असलेल्या उधना-मंगळूर द्विसाप्ताहिक स्पेशलला विशेष पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. पावसामुळे स्पेशलला २९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. उन्हाळी सुट्टी हंगामातही चाकरमान्यांचा स्पेशलच्या फेर्यांना भरभरून प्रतिसाद लाभले. २९ जूनच्या फेरीनंतर स्पेशल यार्डात विसावणार आहे. या स्पेशलला मुदतवाढ देण्याचा आग्रही कोकण विकास समितीसह प्रवाशांनी धरला आहे.
पश्चिम उपनगरातून धावणार्या उधना-मंगळूर स्पेशलमुळे बोरीवली नालासोपारा, विरार, भाईंदर, वसई येथे वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना गाव गाठताना कराव्या लागणार्या यातायातीला ब्रेक लागला होता. पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना गावी येण्यासाठी सीएसएमटी स्थानक अथवा दादर स्थानक गाठावे लागत होते. यामुळे आर्थिक भुर्दंडासह वेळेचा अपव्यय देखील होत होता.www.konkantoday.com




