
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा सुधारित दौरा
रत्नागिरी, दि. 10 ) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई येथून मोटारीने मंडणगडकडे प्रयाण. सायंकाळी ७.३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रम नियोजन आढावा व पाहणी (स्थळ : दिवाणी व फौजदारी न्यायालय नूतन इमारत, मंडणगड ) रात्रौ ८.३० वाजता मंडणगड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. मध्यरात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
शनिवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राखीव (स्थळ : पाली निवासस्थान) दुपारी 3 वाजता रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : पाली ) सायंकाळी सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने मंडणगड कडे प्रयाण. रात्रौ मंडणगड येथे आगमन व राखीव.




