
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे जिल्हास्तरीय निबंध व वकृत्व स्पर्धा
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या सभागृहात जोळी पाळंद, रत्नागिरी येथे या स्पर्धा होतील. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या दोन्ही स्पर्धा सर्वांसाठी खुल्या आहेत.
या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकांनी अविनाश काळे (9422372212) यांच्याकडे ३० ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी अविनाश काळे (9422372212), राजेंद्र पटवर्धन (9860366991), श्रीनिवास जोशी (9404332705) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.




