
मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाटात कारला अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही
मंडणगड तालुक्यातील आंबडवे ते महाड, राजेवाडी महामार्गाच्या सुरू असलेल्या नुतनीकरणाच्या काम शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील मोठ्या वळणावर रविवारी रात्री एक कार रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बॅरीकेडसवर आदळली. यामुळे गाडीचे नुकसान झाले असले तरी गाडी बॅरीकेडसला आदळून थांबल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
हे वळण महामार्ग प्राधिकरणाने रूंद न केल्याने धोकादायक बनले आहे. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी सूचना देवून काहीही बदल न झाल्याने दुहेरी वाहतुकीसाठी अयोग्य बनलेल्या या वळणावर हा अपघात झाला. सुदैवाने कार रस्त्याचे शेजारी असलेल्या बॅरीकेडसला आदळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे या वळणावर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.www.konkantoday.com




