
थिबाकालीन बुद्धविहारासाठी २७ ऑक्टोबर रोजी बौद्ध समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन…
रत्नागिरी शहरातील थिबा राजा कालीन बुद्धविहारासाठी बौद्ध समाजाच्यावतीने २७ ऑक्टोबर रोजी नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संघर्ष समितीची सर्वसाधारण सभा ५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे पार पडली. या सभेमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील प्रत्येक बौद्ध वाडीमधून शेकडो भीमसैनिक रस्त्यावर उतरणा असून या मोर्चाच्या तयारीसाठी संघर्ष समितीकडून ७ ऑक्टोबर पासून तालुक्यातील प्रत्येक बौद्धवाडीत भेटीगाठी घेण्यात येणार आहेत. पूर्ण रत्नागिरी तालुका पिंजून काढण्यास सुरूवात होणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com




