
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वर्षा परशुराम ढेकणे यांचे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..
प्रभाग क्र. १४ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १४, तेली आळी दत्त मंदिराजवळ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सौ. सत्यवती सत्यवान बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना वेळेवर तपासणीची सुविधा मिळावी या हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मोफत तपासणी सेवा यामध्ये दातांची तपासणी स्तन तपासणी गर्भाशय तपासणी
या उपक्रमात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, सौ सत्यावती बोरकर ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर, सचिन गांधी, मुकुंद विलणकर, प्रवीण ढेकणे, सुरज जोशी, सुनीता लांजेकर, ज्योती कदम, प्रिया खडपे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व महिलांनी या आरोग्यदायी आणि उपयुक्त शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.




