
पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केली शिंदे शिवसेनेच्या ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी;
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी तालुक्यात पालक मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज झाली आहे मध्यंतरीच्या काळात ठाकरे सेनेतून अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुका कार्यकारणीत कोणते पदाधिकारी असतील यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र सर्वांना न्याय देण्यासाठी चक्क 70 पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये नव्या जुन्यांना चांगल्या प्रकारे स्थान देण्यात आले आहे . पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी तालुका आणि विधानसभा मतदारसंघासाठी सप्टेंबर २०२५ ची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली आहे.
या कार्यकारणी मध्ये विधानसभा आणि शहर यांचा समावेश आहे. विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून सुदेश सदानंद मयेकर (थिबा पॅलेस रोड) यांच्यावर संपूर्ण मतदारसंघाच्या धोरणात्मक निर्णय आणि अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा संघटक म्हणून प्रकाश बाबुराव साळवी, जयसिंग उर्फ आबा घोसाळे आणि राजन शेटये यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे
उपजिल्हाप्रमुख पदावर गजानन पाटील (तालुका), राजेश मुकादम (मतदार संघ) आणि संजय प्रभाकर साळवी (शहर) या तिघांची नेमणक करण्यात आली आहे.
तालुका पातळीवर ताकद वाढवण्यासाठी प्रदिप ऊर्फ बंड्या साळवी आणि महेश ऊर्फ बाबू म्हाप या दोन अनुभवी नेत्यांकडे तालुका प्रमुखपदाची संयुक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
विष्णु पवार, दिलीप शिवलकर, शंकर गोरे, शंकर सोनवडकर, राजू शामसुंदर तोडणकर, प्रसाद उर्फ बाबु पाटिल आणि वैभव विठोबा पाटिल या सात जणांना तालुका संघटक म्हणून नेमून, संघटना बांधणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे. प्रशांत सावंत, प्रशांत शेरे, प्रकाश शिंदे, शरद चव्हाण, अरुण झोरे आणि विनोद झाडगावकर हे सहा जण तालुका समन्वयक म्हणून कार्यरत राहतील.
महेंद्र झापडेकर (हरचेरी, पाली), अभय खेडेकर (वाटद, करबुडे), राजेश साळवी (कोतवडे), . विशाल ऊर्फ भैय्या शिंदे (शिरगांव), विलास ऊर्फ बंधू वारिसे (गोळप, पावस) आणि भिकाजी गावडे (नाचणे, मिरजोळे) हे ६ उपतालुका प्रमुख विभागांची जबाबदारी सांभाळतील.
याशिवाय हातखंबा, करबुडे, वाटद, कोतवडे, शिरगांव, मिरजोळे, नाचणे, पावस, गोळप, हरचेरी, फुणगुस आणि नावडी या १२ विभागांमध्ये प्रत्येकी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक असे एकूण २४ तर २० उपविभागांमध्ये प्रत्येकी उपविभाग प्रमुख आणि उपविभाग संघटक असे ४० पदाधिकारी नेमण्यात आले आहेत.
कार्यकारिणीत उर्वरित पदे:
सचिव पदाची जबाबदारी तुफिल पटेल -.कोतवडे, गजानन गुरव – मिरजोळे यांच्यावर सोपवली आहे. एकूण १२ विभाग प्रमुख म्हणून सूचीबद्ध आहेत: सचिन उर्फ तात्या सावंत – विभाग: हातखंबा, प्रविण धोंडू पांचाळ – विभाग: करबुडे, योगेंद्र कल्याणकर – विभाग: वाटद, स्वप्नील उर्फ तारक मयेकर – विभाग: कोतवडे, परेश सावंत – विभाग: शिरगांव, प्रविण पवार- विभाग: मिरजोळे, प्रकाश धोंडू रसाळ- विभाग: नाचणे, विजय चव्हाण- विभाग: पावस, नंदकुमार नारायण मुरकर- विभाग: गोळप,. शंकर विठ्ठल झोरे- विभाग: हरचेरी, महेश प्रभाकर देसाई- विभाग: फुणगुस, अतिश पाटणे- विभाग: नावडी.
तर रत्नागिरी तालुका संघटनेमध्ये तळागाळातील बांधणीसाठी एकूण १२ विभाग संघटक नेमण्यात आले आहेत. यामध्ये दत्तात्रय जयराम शिवगण (हातखंबा) आणि मिलिंद राजाराम खानविलकर (करबुडे) यांचा समावेश आहे. त्याशिवाय अनिकेत अशोक सुर्वे (वाटद),. प्रसाद मधुकर लोगडे (कोतवडे), जितेंद्र जनार्दन नेरकर (शिरगांव), फैय्याज फकीर महम्मद मुकादम (मिरजोळे), . सचिन यशवंत कोतवडेकर (नाचणे), अजय रविंद्रनाथ तेंडुलकर (पावस), गिरीराज उर्फ बाबा शांताराम साळवी (गोळप), सुभाष गणपत भुवड (हरचेरी), परशुराम गोपाळ वेल्ये (फुणगुस) आणि संदिप अनंत रहाटे (नावडी) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर, संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी २० उपविभाग प्रमुख नेमण्यात आले आहेत. यात श्री. गौरव दिलीप संसारे (पाली), श्री. प्रमोद शंकर डांगे (हातखंबा), श्री. सचिन कृष्णा पाचकुडे (करबुडे), श्री. दिपक नारायण गवाणकर (देवूड), श्री. नामदेव हिरू चौघुले (वरवडे) आणि श्री. अजिम अजिज चिकटे (वाटद) यांचा समावेश आहे. पुढे, श्री. स्वप्नील प्रकाश पड्यार (कोतवडे), श्री. मनोज शंकर हळदणकर (मालगुंड), श्री. समीर अभिमन्यू भाटकर (कर्ला), श्री. अभिजीत विजय शिंदे (शिरगांव) आणि श्री. स्वप्नील उर्फ पप्पु अनंत शिवलकर (कासारवेली) हे देखील उपविभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. उर्वरित उपविभाग प्रमुखांमध्ये श्री. दत्ताराम राघो तांबे (गोळप), श्री. पराग चंद्रकांत भाटकर (फणसोप), श्री. प्रविण रमाकांत शिंदे (पावस), श्री. संतोष सन्मुख तोडणकर (गावखडी), श्री. ऋषिकेश भालचंद्र भोंगले (नाचणे), श्री. रविंद्र लक्ष्मण मांडवकर (कुवारबांव), श्री. महेंद्र कृष्णा साळवी (मिरजोळे) आणि श्री. सुमेश सुरेश आंबेकर (केळ्ये) यांचा समावेश आहे.
या शिवाय २० उपविभाग संघटक नेमण्यात आले आहेत. यामध्ये श्री. गणेश प्रकाश चव्हाण (पाली), अनिल गंगाराम पाडावे (हातखंबा), श्री. हरीश्चंद्र विठ्ठल बंडबे (करबुडे), श्री. सुभाष माणीक गोवळकर (देवूड), श्री. गजानन धोंडू हेदवकर (वरवडे) आणि श्री. सतिश विठ्ठल थुळ (वाटद) यांचा समावेश आहे. तसेच श्री. स्वप्निल दत्ताराम शिंदे (कोतवडे), श्री. दिपक प्रकाश दुर्गवळी (मालगुंड), श्री. भिकाजी यशवंत शिणगारे (हरचेरी), श्री. अतिक अब्दुल लतीफ गडकरी (कर्ला), श्री. गणेश सिताराम भरणकर (शिरगांव) आणि श्री. हर्षल राजन साळवी (कासारवेली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित उपविभाग संघटकांमध्ये श्री. संदिप लक्ष्मण तोडणकर (गोळप), श्री. नामदेव नारायण कोकरे (पावस), श्री. जितेंद्र महादेव शिर्सेकर (गावखडी), श्री. प्रितम (मुन्ना) प्रकाश घोसाळे (नाचणे), श्री. प्रशांत चंद्रकांत खानविलकर (कुवारबांव), श्री. मंगेश उर्फ पप्पू दत्ताराम पवार (मिरजोळे) आणि श्री. कैलास यशवंत तांबे (केळ्ये) यांचा समावेश आहे.




