आयटीआय रत्नागिरी येथे तासिका तत्वावर पदभरती20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा


रत्नागिरी, दि. 17 ):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथे एप्लॉयएबीलिटी स्किल हा विषय शिकविण्यासाठी आणि आरेखक यांत्रिकी व वीजतंत्री या व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी 28 दिवसांच्या कालावधीकरिता घड्याळी तासिका तत्त्वावर पदभरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक/अनुभव प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रतीसह 20 सप्टेंबर 2025 पर्यंत संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्र. प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांची लेखी व बौध्दिक, कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. पात्र मनुष्यबळाची निवड शासनाने विहित केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव व कौशल्य यानुसार करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button