
चिपळूण शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
चिपळूण शहरातील बहुतांशी सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था समोर आली आहे. विशेष म्हणजे काही स्वच्छतागृहांचा मैला थेट नदीपात्रात मिसळत असल्याची ओरड सुरू आहे. सेफ्टी टँकला लागलेली गळती, अस्वच्छता यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढवले आहे. ही स्वच्छतागृह काहीशी डोकेदुखी ठरू लागली आहेत. त्यामुळे त्यांची गंभीर दखल घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगर पालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा विभागामार्फत संयुक्तपणे सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल तयार कर्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.www.konkantoday.com




