
रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा
रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा २८ सप्टेंबर रोजी टीआरपी येथील अंबर हॉल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी कुलस्वामिनी माता श्री तुळजाभवानीची पूजा, स्वागतगीत, मान्यवर व्यक्ती आणि गुणवंताचे सत्कार आयोजित करण्यात आले आहेत.
सत्कार समारंभासाठी रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील ९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सीईटी, नीट, जेईई या परीक्षेमध्ये २०० पैकी १६० किंवा अधिक गुणप्राप्त पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले मराठा समाजातील विद्यार्थी, रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती आणि एनएमएमएस परीक्षेतील मराठा समाजातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या कला-क्रीडा-सामाजिक इत्यादी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मराठा समाजातील व्यक्तींचे सत्कार करण्यात येणार आहेत.
इच्छुक आणि पात्र विद्यार्थी व नागरीकांनी आपली सविस्तर माहिती क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्यालय, बेसमेंट स्टोअर क्र. ३, बी- विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, गोडबोले स्टॉप, मजगाव रोड, रत्नागिरी येथे १५ सप्टेंबरपर्यंत, सोमवार व सार्वजनिक सुट्टी सोडून मंडळाच्या कार्यालयीन वेळेत दुपारी १.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पाठवावी. किंवा 7020357030, 8830974065 या नंबरवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवावी. प्राप्त माहितीवरुन सत्कारमूर्तींची निवड कार्यकारी मंडळातर्फे निश्चित करण्यात येईल.




