
चिपळूण शहरातील उड्डाण पुलाच्या सुरक्षिततेसाठी जाळीचा उतारा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरात सुरू असलेल्या उड्डाण पूल बांधकामात आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघात बडत आहेत. सोमवारी उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच पिलरवरील सळी हातावर पडून महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाल्यानंतर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने कंत्राटदार कंपनीने मंगळवारपासून कामाच्या ठिकाणी जाळी लावून कामाला सुरूवात केली आहे. तर ८ रोजी प्रांताधिकार्यांनी महामार्ग विभाग व ठेकेदार याची बैठक बोलावली आहे.
महामार्गचे चिपळूण तालुक्यातील बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. शहरातील जाणार्या उडाण पुलाचे काम गेल्या ४-५ वर्षांपासून सुरच राहिले आहे. ३ वर्षापूर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाण पुलाचे गर्डर कोसळल्यानंतर पुलाच्या रचनेत बदल करून नव्या रचनेनुसार त्याची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार सध्या उड्डाण पुलाच्या उभारणीचे काम सरू आहे. उहाणपूल व घडत आहेत. गतवर्षी धावत्या टकलाच गर्डरची जाळी अडकली होती. तर पिलरचे काम सुरू असताना २ कामगार पडून जखमी झाले होते.www.konkantoday.com




