
नाणिजधाम येथील आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळेचा निकाल 100 टक्के
नाणीज , दि. २०: नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या आद्य जगदगुरु रामानंदचार्य वेदपाठशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.२०२४ ते २५ या शैक्षणिक वर्षांमध्ये वेदपाठशाळेच्या१४ व्या बॅच चा हाय्यर डिप्लोमा इन पौरोहित्य हा कोर्स पूर्ण झाला आहे. या बॅचचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये सोहम संजय पडवळ या विद्यार्थ्याने ८३.२५ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर समर्थ शिवराम शिंदे या विद्यार्थ्यांने ७५.३८ गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे, मानस चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याने ७५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा नाणीजधाम या वेदपाठशाळेचा निकाल आतापर्यंतच्या सर्व बॅचेस चा शंभर टक्के लागला आहे. यावर्षीही सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी सामाजिक उपक्रमांतर्गत या वेदपाठशाळेची २०१० साली निर्मिती केली. इथे सर्व जातीच्या मुलांसाठी पौरोहित्याचे शिक्षण मोफत उपलब्ध करून दिले आहे. ही वेदपाठशाळा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर या विद्यापीठाशी संलग्न आहे .इथे हायर डिप्लोमा इन पौरोहित्य या कोर्सच्या अंतर्गत वेदांचे ज्ञान तसेच पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते ,या दोन वर्षांच्या शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांना निवासाची, भोजनाची तसेच युनिफॉर्म व सर्व शालेय साहित्याची सोय संस्थानाच्या वतीने मोफत केली जाते सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत पुरवण्यात येतातआजवर साडेचारशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इथे पौरोहित्य कलेचे शिक्षण घेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे,स्व _स्वरूप संप्रदायाच्या पुरोहित मंचाचे चेअरमन कुंडलिक वायभासे प्राचार्य कीर्तिकुमार भोसले,शिक्षक योगेश कुऱ्हाडे गुरुजी, हितेश बागल गुरुजी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजीं तसेच पिठाचे उत्तर अधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत,..