
जिल्ह्यातून आय. ए एस. आयपीएस अधिकारी घडावेत ही माझी प्रामाणिक इच्छा:- आमदार किरण सामंत
रत्नागिरी युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहून टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज लांजा राजापूर साखरपा विधान सभेचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेचे आमदार किरण सामंत यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या टॅलेंटचा शोध घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम युवा संदेश प्रतिष्ठान करत आहे याचा मला अभिमान आहे. समाजातील घटकांसाठी अशी कामे करणाऱ्या संस्था खूप कमी असतात त्या पैकी ही संस्था आहे. विद्यार्थ्याच्या विविध कौशल्याचा विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यामागे मी खंबीर पणे उभा असल्याचे सांगितले. माझ्या जिल्ह्यातील असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यापैकी आय एस. आय. पी. क्लास वन अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत असल्याचा शब्द आमदार किरण सामंत यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते सुदेश मयेकर, युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश सावंत, मा. नगरसेवक विकास पाटील, जितेंद्र शेट्ये, श्री ल.रनसे, संदीप सावंत, दीपक माळी, राजू डांगे, श्रीधर दळवी, प्रकाश काजवे, संदीप मोरे विजय कुळये यांच्या सहित पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.