
रत्नागिरी येथे तलवारबाजी खेळाचे पंच परीक्षा व उद्बोधन वर्गाचे आयोजन
जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 जुलै २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे तलवारबाजी या खेळाचे पंच परीक्षा व उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उद्बोधन वर्ग व पंच परीक्षेसाठी खेळाडू व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या पंच परीक्षा व उद्बोधन वर्गासाठी मार्गदर्शन करावयाला साताऱ्याहून श्री प्रफुल्ल जगताप राष्ट्रीय पंच व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हे उपस्थित होते. त्यांनी तलवारबाजी या खेळाचे तंत्रशुद्ध अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले व खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यांच्यासोबत सहाय्यक मार्गदर्शक म्हणून मार्तंड झोरे यांनी काम पाहिले या उद्बोधन वर्ग व पंच परीक्षेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, क्रीडा कार्यकारी अधिकारी ऐश्वर्या सावंत, क्रीडा अधिकारी सुनील कोळी, क्रीडा अधिकारी गणेश जगताप क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे उपस्थित होते. जिल्हा तलवारबाजीअसोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती समिधा झोरे व सचिव श्री. मार्तंड झोरे यांच्या उपस्थितीत