
कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर येथे घरपोडी 27000 चा ऐवज लंपास.
एसटी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले विनायक कृष्णा संसारे (वय ५३, रा. कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घोरपडी करत २७ हजार ५५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.विनायक संसारे यांचे कोंडअसुर्डे येथील राधाकृष्ण मंदिराजवळील घरात अज्ञात चोरट्याने कपाट चवीने उघडून त्यामधील ऐवज लंपास केला. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये १४,००० रुपये रोख रक्कम, चांदीची पैंजण, चांदीची जोडवी, मोबाईल फोन, नाणी, सोन्याची पुली, सोन्याचा मुलामा असलेली चैन व सुमारे १ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र यांचा समावेश आहे.या प्रकारानंतर विनायक संसारे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात १९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.