
आधुनिक जगातील प्रभावी उपचार पद्धती म्हणजेच ‘योग’.
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांचे गौरवोद्गार आपल्या भारतीय परंपरेत विविध शास्त्रांचा समावेश आहे. योग मात्र प्राचीनतम ज्ञान असूनही आजच्या काळात ते तंतोतंत लागू आहे. आजच्या आधुनिक काळात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य संतुलनाची प्रभावी उपचार पद्धती म्हणजेच ‘योग’ आहे असे गौरवोद्गार रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी काढले. ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे ११ व्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.



यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील बी ए आणि एम ए योगशास्त्राचे विद्यार्थी व योग अभ्यासक नागरिक ,उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यावेळी उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी यांनी उपस्थिताना विविध आसने, प्राणायाम याचे प्रात्यक्षिक त्याच्या उपयोगितेसह शिकवले. तसेच सर्वांनी आजीवन योग करण्याचा संकल्प यानिमित्ताने केला.कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली.

