“तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र” – एक अनोखा, अद्वितीय छायाचित्रण उपक्रम! ✨📸एक दृश्यगाथा, एक आत्मानुभूती….!!!!


धुक्याच्या कुशीत विसावलेले किल्ले... सोनेरी वाळूने नटलेले समुद्र किनारे... शांत, रम्य आणि मनोहर MTDC रिसॉर्ट्स...हिरवाईने भरलेले उत्सवी डोंगर......आणि प्रत्येक वळणावर, एक नवीन कथा सांगणारा महाराष्ट्र.. !! रंगांच्या, गंधांच्या, आणि भावनांच्या या भूमीत – महाराष्ट्र म्हणजे केवळ एक राज्य नाही, तर एक अनुभव आहे, एक काव्य आहे, जिथे दररोज नवे सूर, नवे रंग, नवे क्षण जन्म घेतात... अशा या आमच्या एका सुंदर एमटीडीसी पर्यटनस्थळी भेट दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत आणि आभार!
कधी कोकणाच्या किनाऱ्यावर कविता करणाऱ्या शांत लाटा…. तर कधी सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये धुकं इतिहासाच्या कहाण्या सांगत असतं... कधी एखाद्या गावाच्या मळ्यातले निळसर आभाळ मन गुंतवून टाकतं, तर कधी शहारवून टाकणाऱ्या उत्सवांमध्ये महाराष्ट्राचे धडधडते हृदय उमटते! आम्ही शोधतोय अशाच काव्यमय क्षणांचं दर्शन घडवणारे डोळे... आणि तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलेलं, आत्म्याला भिडणारं महाराष्ट्राचं रूप.
महाराष्ट्रातील विविध रंग, रूपं आणि क्षण टिपणाऱ्या छायाचित्रप्रेमींना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सादर करत आहे – “महाराष्ट्र तुमच्या कॅमेऱ्यातून” – एक छायाचित्र उपक्रम, जिथे तुमचा दृष्टिकोन बनतो महाराष्ट्राचा आरसा…!!!!
आपल्या प्रवासातील अविस्मरणीय क्षण आमच्यासोबत शेअर करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आपल्याला आग्रहपूर्वक आमंत्रित करतो. एमटीडीसीच्या कोणत्याही स्थळी आपण काढलेले आवडते फोटो येथे अपलोड करा. या उपक्रमामध्ये, आपल्याच नजरेतून महाराष्ट्राचं सौंदर्य जगासमोर मांडण्याचा आमचा उद्देश आहे, असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मा.मनोजकुमार सुर्यवंशी, (भाप्रसे) यांनी व्यक्त केले आहे.
तुमच्या कॅमेऱ्यात कैद झालेले – नैसर्गिक सौंदर्य…. सांस्कृतिक वारसा… भौगोलिक वैशिष्ट्ये…. आणि रोजच्या जीवनातील अस्सल मराठमोळे अनुभव…

म्हणूनच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) घेऊन येत आहे – “महाराष्ट्र तुमच्या कॅमेऱ्यातून” – एक अभिनव छायाचित्रण स्पर्धा, जिथे तुमच्या लेन्समधून उलगडेल महाराष्ट्राची अमोल कहाणी! या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमच्या कॅमेऱ्यात साठवलेले हे क्षण आमच्याशी शेअर करा!  हे असू शकतं एखादं समुद्रकिनाऱ्यावरचं आळसलेलं दुपारचं क्षणचित्र, गडकोटांच्या पार्श्वभूमीवर एखादं धुकं भरलेलं सूर्योदयाचं दृश्य, किंवा एखाद्या गावातली पारंपरिक सणाची झलक – प्रत्येक फोटो एक भावनाप्रधान गोष्ट सांगणारा असावा. 

🏆 दररोज, दर आठवड्याला, महिन्याला आणि वर्षभरात सर्वोत्तम छायाचित्र निवडले जाईल!
त्यासाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत :-

✔ दृश्य प्रभाव व सौंदर्यदृष्टी
✔ सांस्कृतिक, नैसर्गिक व भौगोलिक सुसंगती
✔ सर्जनशीलता, कलात्मक मांडणी व छायाचित्रामागची कथा

दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे आणि अखेर वर्षभरातील सर्वोत्तम छायाचित्रांना MTDC च्या अधिकृत वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व विविध कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित होतील आणि तुम्हाला मिळेल अनोखी प्रसिद्धी…!!! तुम्ही पर्यटक म्हणुन व्हाल 'महाराष्ट्राचे दृश्यकथाकार'! प्रत्येक आठवड्यातून व महिन्यातून निवडक फोटो "Image of the Day", "Image of the Week" आणि "Image of the Month" म्हणून गौरवले जातील. महिन्याच्या विजेत्यांना एक विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. वर्षाअखेरीस, "Image of the Year" म्हणून निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील, तसेच टॉप १० उत्कृष्ट फोटोसाठी ‘Honourable Mention’ सुद्धा दिली जाईल. विजेत्या छायाचित्रांपैकी काही निवडक फोटो खास प्रदर्शितही केले जातील. आपलाही फोटो या सुंदर कहाणीचा भाग होऊ द्या आणि जगभरातील प्रवाशांना महाराष्ट्रात यायला प्रेरणा द्या!

हा उपक्रम पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. अतुल पाटने सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असुन महामंडळाचे मा. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर्वांशी समन्वय साधुन सदर उपक्रम राबवित आहेत, अशी माहीती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले

🖼 तुमचा फोटो आजच पाठवा!
👉 Upload Link – https://forms.gle/rpUWF8zTQudr7jzh8

📍 अधिक माहितीसाठी भेट द्या – www.mtdc.co

⏳ गडबड नको – कॅमेरा घ्या, क्षण टिपा आणि महाराष्ट्र जगाला दाखवा! क्लिक करा… टिपा क्षण… आणि महाराष्ट्राचा आत्मा साकार करा! कदाचित तुमच्या एका क्लिकमुळे जगाला महाराष्ट्र वेगळ्या नजरेतून पाहायला मिळेल…

दिपक हरणे,
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button