
स्वरूपानंद पत संस्थेने ३५० कोटींचा टप्पा आज गाठला -: दीपक पटवर्धन
स्वरूपानंद सहकारी पत संस्थेने ३५० कोटींच्या ठेवी आज पूर्ण केल्या.
स्वामी स्वरूपानंद पत संस्थेने ठेववृद्धि मास सुरू होण्या च्या पूर्वी ४ दिवस हा टप्पा पूर्ण करून २० जून च्या ठेव वृद्धी मासाच्या प्रारंभीच उत्साही वातावरण निर्माण केले.
२३ हजार ठेव खात्यांच्या माध्यमातून ३५० कोटींचा ठेव टप्पा गाठला असून संस्थेच्या १७ ही शाखा मध्ये ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत असल्याने ३५० कोटींचा ठेव टप्पा अल्प कालावधीत संस्थेने पूर्ण केला.
संस्थेचे कर्ज २६३ कोटी ३३ लाख झाले असून १५० कोटींच्या गुंतवणुका संस्थेने बँकामध्ये केल्या असून भांडवल पर्याप्तता CRR] २८%राखली अहे.
९९.७२% इतकी विक्रमी वसुली केली असून. ४८ कोटींच्या घरात स्वनिधी असलेली संस्था म्हणून विश्वासार्ह संस्था म्हणून जनतेच्या मनात आपले स्थान स्वरूपानंद संस्थेने केले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.