
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गटारांची तातडीने दुरूस्ती करा, जिजाऊ ब्रिगेडची मागणी.
चिपळूण शहरातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गटारांवरचे स्लॅब अनेक ठिकाणी ढासळले आहेत. यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही, याचा फटका स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे. तरी या गटारांची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड चिपळूणने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चिपळूण शहरातून जात आहे. बहाद्दूर शेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेफ्टीसाठी पत्रे लावले गेले आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला असल्याने नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महामार्गाच्या गटारावरून चालत जावे लागते.www.konkantoday.com