
पाईपलाईन फुटल्याने खेडमध्ये ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाई.
गेल्या दोन दिवसांपासून खेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे खेड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीपात्रात फुटल्याची घटना घडली आहे. परिणामी शहरात पावसाळ्याच्या ऐन भरातच पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे ही पाईपलाईन मोठ्या दाबाखाली तुटली असून, त्यामुळे संपूर्ण शहराचा नियमित पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना खाजगी टँकरच्या आधारे पाण्याची सोय करावी लागत आहे. नगर पालिकेकडून तातडीने पर्यायी उपाययोजना सुरु करण्यात आली असून नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत दक्षतेने आणि मर्यादित प्रमाणात करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com