
वाहन चालकांना झाले तरी काय, डंपरने तीन जणांना चिरडले.
मुंबईत अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शहरात वर्दळीच्या ठिकाणी अपघात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोस्टल रोडच्या बोगद्यात सकाळच्या सुमारास कार अपघाताची घटना घडली. त्यानंतर आता गोवंडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. गोवंडीतील वर्दळीचं ठिकाण असलेल्या शिवाजीनगर सिग्नलवर भीषण अपघात झाला.गोवंडीतीत शिवाजीनगर सिग्नलवर डंपरने धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर शिवाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अपघातानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले. या लोकांनी रस्ता अडवला.
रस्ता अडवल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगर भागात एका डंपर चालकाने तीन जणांना चिरडल्याची घटना दुपारी घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावर ठिय्या दिला आहे. संतप्त जमावामुळे या मार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातातील आरोपी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस पोहोचले आहेत.