
रत्नागिरीजवळच्या खेडशी आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय प्रकरणी आणखी दोन जण ताब्यात.
रत्नागिरी शहरा जवळील खेडशी परिसरात काही दिवसांपूर्वी गौरव लॉजमध्ये पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी तेथे असणार्या दोन तरूणींना ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. आता याप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची रवानगी २४ मे पर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.रत्नागिरीजवळच्या खेडशी आकाशवाणी केंद्रासमोरील गौरव लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश करताच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पकडलेल्या दोन तरूणींना कायदेशीररित्या कारवाई करून त्यांची रवानगी महिलाश्रमात करण्यात आली. आणखी एका तरूणाला अटक करण्यात आली होती. तपास सुरू असताना आणखी दोन तरूणांची नावे समोर आली. पोलिसांनी त्यांना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांची रवानगी २४ मे पर्यंत पोलिस कोठडीत केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस स्थानकाचे निरीक्षक यादव करत आहेत.