
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता विभागस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे गुरुवारी उद्घाटन.
रत्नागिरी, दि.21 ) : उच्च व तंत्र शिक्षक विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसहाय्याच्या विविध योजनांविषयी दिनांक २२ व २३ मे रोजी दोन दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, खारेघाट रोड येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते गुरुवारी 22 मे रोजी सकाळी 11 होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर असतील. दि. 22 मे रोजी पहिल्या सत्रात पश्चिम सहाय्यक क्षेत्रिय अधिकारी शौविक बिस्वास हे सार्वजनिक ग्रंथालयांना ‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजना’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात ‘सोशल मिडीया आणि ग्रंथालयाचे बदलते स्वरुप’ या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल, किरण धांडोरे, हे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे हे ‘ग्रंथालय संचालनालयाच्या विविध योजना’ या विषयावर विभागातील उपस्थित सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील.
दि.23 मे रोजी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सहाय्यक धर्मादाय आयुक्त एन. एस. सय्यद या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय वार्षिक अहवाल, अंकेक्षण अहवाल, कार्यकारणी बदल अहवालबाबत मार्गदर्शन, शंका निरसन या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात ग्रंथालय संचालनालयाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. विजयकुमार जगताप ‘LGMS प्रणाली व ई-ग्रंथालय आज्ञावली’ या विषयावर मार्गदर्शन करतील .तिसऱ्या सत्रात मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोडे, हे ग्रंथालयाचे प्रभावी व्यवस्थापनात : ग्रंथपाल आणि पदाधिकारी यांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. समारोप संमारंभात उपसंचालक शशिकांत काकड हे उपस्थित सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र वाटप करुन कार्यशाळेची सांगता करण्यात येणार आहे. तरी कोकण विभागील सर्व शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी व पदाधिकारी यांनी या कार्यशाळेचा मोठ्याप्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी दिपक झोडगे यांनी केले आहे.00