
आयटीआय गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु.
रत्नागिरी, दि. 21 :- मायनाक भंडारी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर येथे प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासंबंधी माहितीकरीता गटनिदेशक पी. डी. गुरखे, (मोबाईल क्रमांक ९४२३८७८७९७) यांना सपंर्क साधावा.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागर येथे कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, सुईंग टेक्नोलॉजी, डिझेल मेकॅनिक, फीटर हे व्यवसाय शिकविले जातात. वेल्डर व स्युइंग टेक्नॉलॉजी करीता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण आहे व इतर सर्व व्यवसायांकरीता दहावी उत्तीर्ण आहे.इलेक्ट्रीशियन व फिटर या व्यवसायाकरीता दोन वर्षांचा कालावधी आहे व इतर सर्व व्यवसायांकरीता एक वर्षाचा कालावधी आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन प्रवेश अर्ज, इयत्ता दहावीचे गुणपत्रक मूळप्रत, शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत्त, मूळ फोटो, आधारकार्ड, प्रवेश फी, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांग / अनाथ / प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास), नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), इंटरमिजीयेट चित्रकला प्रमाणपत्र (लागू असल्यास), राष्ट्रीयस्तर/राज्यस्तर/जिल्हास्तर खेळाचे शासनमान्य प्रमाणपत्र (लागू असल्यास)संस्थेची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत. जागतिक दर्जाची इमारत, यंत्रसामग्री व फर्निचर, अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग, माफक फी (प्रशिक्षण शुल्क), सर्व पात्र विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन, शिकाऊ उमेदवारी, नोकरी, स्वयंरोजगार मार्गदर्शन कक्ष, एस टी पास सवलत, 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर 2 विषय घेऊन 12 वी समकक्षता प्रमाणपत्र देण्याची संधी, बीए, बीएससी साठी प्रवेश, दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिप्लोमासाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी. त्यामुळे बी टेक/बीई थेट द्वितीय वर्षात प्रवेश संधी एमएचसीइटी परीक्षा आवश्यकता नाही.
भारतीय सैन्य दलात अग्निवीर सैन्यभरतीसाठी अधिकचे गुण, सुइंग टेक्नॉलॉजि व्यवसायासाठी पंचायत समिती कार्यालया मार्फत शिलाई मशिन, शिकाऊ उमेदवारी एमएपीएस / एनएपीएस प्रोत्साहन भत्ता, नोकरी रेल्वे, एमएसईबी, पीडब्लूडी, एअरइंडिया, महानगर पालिका, टाटा, महिंद्रा, बाजाज, रिलांयन्स, इत्यादी तसेच परदेशात नोकरी, मागासवर्गीयांना प्रशिक्षण शुल्क माफ व मोफत हत्यारपेटी, स्वयंरोजगारासाठी अत्यंत कमी व्याजदरात शासनाकडून कर्ज.दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वंयरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर यांनी केले आहे.