
मुंबई-गाेवा महामार्गावरील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी तत्काळ उपाययाेजना करा, ना. अजितदादा पवार यांचे आदेश
मुंबई-गाेवा महामार्गावरील सततच्या वाहतूक काेंडीवर पर्याय काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पर्यायी मार्ग तसेच वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी तत्काळ उपाययाेजना करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अधिकाèयांना दिले. रविवारी (दि. 18) ना. पवार यांनी मुंबई-गाेवा महामार्ग कामाची पाहणी केली. या वेळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.