
जादा गाड्यांमुळे काेकण मार्गावरून उशीरा धावत आहेत गाड्या
काेकण मार्गावरून धावणारी एलटीटी मडगाव एक्स्प्रेस शनिवारी मध्यरात्री 12.45 ऐवजी रविवारी सकाळी 8.15 वाजता एलटीटी स्थानकातून सुटल्याने तब्बल 8 तास प्रवासी खाेळंबले. एक्स्प्रेस उशिराने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. अन्य सात रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. ’विकेंड’लाच झालेल्या रखडपट्टीने प्रवाशांना घाम ुटला.
उन्हाळी सुट्टी हंगामामुळे उन्हाळी स्पेशल हाऊसुल धावत आहेत. चाकरमान्यांना रेटारेटीचा प्रवास करत गाव गाठावे लागत आहे. त्यात विलंबाच्या प्रवासाचीही भर पडत असल्याने प्रवाशांचे हाल हाेत आहेत.www.konkantoday.com