
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली ते विलवडे मार्गावरदरड कोसळली रेल्वे वाहतुकीवर परिणाम
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली ते विलवडे मार्गावर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला दरडीचा भाग रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने दुपारपासून जिल्ह्याला झोडपले आहे मुसळधार पावसाबरोबरच विजा चमकून पावसाच्या सरी कोसळत होत्या कोकण रेल्वे मार्गावर वेरवली ते विलवडे मार्गावर दरड कोसळली ती बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत तर काही गाड्या नजीकच्या रेल्वे स्थानकात थांबवण्यात आले आहेत