
खेड तालुक्यातील कुडोशी गावाजवळ दुचाकी व टेम्पो अपघातात एक जण जखमी.
खेड तालुक्यातील कुडोशी गावाजवळ खेडकडून देवघरकडे जाणारी ऍक्टिव्हा आणि समोरून येणारा मालवाहतूक टेम्पो मॅक्सिमो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ऍक्टिव्हा चालक गंभीर जखमी झाला आहे.जखमी व्यक्तीची ओळख योगेश मनोहर मोहिते (वय ४५, राहणार देवघर बौद्धवाडी) अशी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच, खेड भरणे नाका ब्रिजजवळ असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी योगेश मोहिते यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.