मृतदेहाच्या हलगर्जीप्रकरणी त्या वैद्यकीय अधिकार्‍याची तात्पुरत्या स्वरूपात बदली.

लांजा तालुक्यातील साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलेल्या रूग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह व्हरंड्यात ठेवून हलगर्जी केल्याप्ररणी अखेर साटवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करताना रिंगणे येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. तर या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे अहवाल सादर करण्यात आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी सांगितले.गंभीर अवस्थेतील रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीचा मृतदेह दोन तास साटवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरंड्यात ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार ३ मे रोजी साटवली येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button