
भारताचा विरोध तरीही पाकिस्तानला फायदा; IMF कडून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी.
भारत आणि पाकिस्तानयांच्यात तणाव वाढलेला असताना पाकिस्तानसाठी फायद्याची बातमी आली आहे. भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (IMF Loan) तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे.आयएमएफने याआधीही पाकिस्तानला कर्ज दिले होते. या कर्जाचा बैठकीत आढावा घेण्यात आला. संघटनेच्या या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप घेतला. पाकिस्तान आयएमएफकडून सातत्याने कर्ज घेत आहे. परंतु, या कर्जाचा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याऐवजी आतंकवादला पोसण्यात करत आहे.
वारंवार कर्ज दिल्यानंतरही पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधारणा का होत नाही असा सवाल भारताच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. यानंतर या मुद्द्यावर मतदान घेतले. भारताने या मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. आयएमएफचा (हा निर्णय जागतिक मूल्ये आणि सुरक्षेसाठी अतिशय धोकादायक आहे असे संकेत दिले.