
कोत्रेवाडीचा डंपिंग ग्राऊंड प्रकल्प रद्द करा, कोत्रेवासियांची माजी आमदार राजन साळवी यांच्याकडे मागणी.
कोत्रेवाडी डंपिंग ग्राऊंड प्रकल्पात तुमचा सुतराम संबंध नसेल तर पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोत्रेवाडीतील डंपिंग ग्राऊंड प्रकल्प रद्द करण्याची मागणी कोत्रेवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.कोत्रेवाडी येथील डंपिंग ग्राऊंड प्रकल्पाशी माझा सुतरामही संबंध नाही तसेच लोकांचा विरोध असलेल्या डंपिंग ग्राऊंड प्रकरणात मी कोत्रेवाडीतील ग्रामस्थांसोबत आजही आहे आणि कायम राहणार, असा खुलासा लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राजन साळवी यांनी केला. या पार्श्वभूमीवर कोत्रेवाडी ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, साळवी यांनी आपण डंपिंग ग्राऊंड विरोधात असलेल्या ग्रामस्थांसोबत राहणार असल्याचे सांगितले. या त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र केवळ आमच्या सोबत न राहता हा डंपिंग ग्राऊंड प्रकल्प रद्द करा, अशी आमची मागणी आहे. साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.www.konkantoday.com