
जमीन जागेच्या वादा-वादीतून तंटामुक्ती सभेतच चुलत भावांमध्ये झाली हाणामारी.
रत्नागिरी तालुक्यातील गडनरळ येथे जमीन जागेच्या वादा-वादीतून मारहाण करुन पाठीला चावा घेतला. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश हरिश्चंद्र मेढेकर (वय ४२, रा. कोळीसरे, मेढेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास गडनरळ ग्रामपंचायत येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष पांडुरंग मेढेकर (वय ४५, रा. कोळीसरे मेढेकरवाडी, रत्नागिरी) हे व संशयित नात्याने चुलत भाऊ आहेत.
त्यांच्यात पुर्वीपासून जमिन जागेवरुन वाद-विवाद आहेत. शनिवारी वाद मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीकडे मिंटीग करिता आले असता दोघांमध्ये बाचाबाची होवून संशयिताने फिर्यादी संतोष मेढेकर यांना मारहाण करुन मानेला व पाठीला जोरदार चावा घेतला व तुला बघुन घेईन अशी धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी संतोष मेढेकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली