कै. लीला रामचंद्र फडके स्मृती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत प्रारं.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सातव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात आज रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे झाली. कै. लीला फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्ह्यातील २५ वर्षे वयोगटातील खेळाडूंकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन कै. लीला फडके यांचे नातू नरेंद्र घाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तनया घाणेकर, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी, आयोजक चैतन्य भिडे यांसह इतर बुद्धिबळप्रेमी उपस्थित होते. एकूण सहा फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीने बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक बुद्धिबळ संघटनेचे फिडे मानांकन असलेल्या जिल्ह्यातील नऊ बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.चिपळूणच्या श्रीहास नारकर याने पहिल्याच फेरीत तृतीय मानांकित सोहम रुमडे विरुद्ध अटीतटीच्या डावात विजय प्राप्त केला व दुसऱ्या फेरीत पाचव्या मानांकित यश गोगटे विरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. तर आर्या पळसुलेदेसाई हिने सहाव्या मानांकित वेद डोईफोडेला बरोबरीत रोखले. दोन फेऱ्यांअखेर प्रथम मानांकित आयुष मयेकर सह वरद पेठे, निधी मुळ्ये, साहस नारकर, सई प्रभुदेसाई, प्रणव मुळ्ये व अन्वय अंबिके प्रत्येकी दोन गुणांनीशी संयुक्तरित्या आघाडीवर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button