
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक
साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली. मेधा पाटकर यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.पाटकर यांच्या विरोधात न्यायालयाने दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या अवमानप्रकरणी दंड ठोठावला होता. परंतु पाटकर यांनी दंडाची रक्कम भरली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाटकर मात्र हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला होता. याच प्रकरणात मेधा पाटकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
अटक केल्यानंतर मेधा पाटकर यांना आजच साकेत न्यायालयात हजर करण्यात येईल