
पहलगामधील दहशतवादीआसिफ शेख याच्या घरी तपासणी करण्यासाठी गेलेल्या पोलीस व अधिकाऱ्यांच्या समोर घरात झाला बॉम्बस्फोट.
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे.हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर बेचिराख झालं.
पोलीस त्राल येथील आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या. पोलिसांनी सांगितलं की घरात आम्हाला स्फोटकं दिसली होती जी आम्ही जप्त करण्याआधीच स्फोट झाला. घरात स्फोटकं पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व संरक्षण दलाचे जवान मागे हटले. तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचं घर बेचिराख झालं. अतिरेक्यांनी पोलीस व गुप्तचर यंत्रणा या घरी धडकतील आणि तपास करतील याचा अंदाज घेऊन आधीच इथे स्फोटकं (उदा. टाईम बॉम्ब) ठेवली असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.