
कुणबी समाज नेते निसर्गवासी नंदकुमारजी मोहिते सर यांची रविवार दि. २० एप्रिल रोजी मुलुंड पूर्व येथे आदरांजली सभा
आबलोलीमाजी जिल्हा परिषद सदस्य व कुळ कायद्याचे गाढे अभ्यासक कुणबी समाजासह सर्व सामान्य जनतेचे नेते आणि शामराव पेजे महाविद्यालय अध्यक्ष व बहूजन विकास आघाडी या राजकीय पक्षाचे नेते निसर्गवासी नंदकुमारजी मोहिते सर यांचे गुरुवार दि. ६ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण कुणबी समाजावर एक आघात झाला होता समाजात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली.कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गवासी नंदकुमारजी मोहिते सर यांची आदरांजली सभा मुलुंड पूर्व येथील त्रिमूर्ती सभागृह, कुणबी विद्यार्थी वसतिगृह येथे रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता आयोजित करण्यात आली असून या आदरांजली सभेला कुणबी एकीकरण समीती महाराष्ट्र राज्य, के सी सी आय आणि बळीराज सेना यांचेसह सर्व आमंत्रित संस्थांचे पदाधिकारी, तसेच मोहिते सर यांचे कुटुंब, हितचिंतक यांनी बहूसंख्येने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी एकीकरण समीती महाराष्ट्र राज्य, बहूजन विकास आघाडी आणि बळीराज सेना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे