स्वरूपानंदची वर्ष अखेर ही उत्सवी, आनंददायी असते – ॲड. दीपक पटवर्धन

वर्ष अखेरीचा दिवस हा खरतर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्जतेचा असतो. स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये ३१ मार्च हा उत्साही पद्धतीने साजरा केला जातो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.प्रत्येक वर्षी ३१ मार्च या वर्ष अखेरीच्या दिवशी संस्थेची आकडेवारी जाहीर करण्याचा संकेत आम्ही गेली २८ वर्ष पाळला आहे. सातत्यपूर्ण वसुली पाठपुरावा करत कर्जदारांना त्यांची कर्जफेडीची जबाबदारी हे त्यांचं कर्तव्य वाटावं असेच संस्कार स्वरूपानंदच्या यंत्रणेमार्फत केले जातात. स्वाभाविकपणे प्रत्येक तिमाही अखेर त्या तिमाहीची वसुली पूर्ण केली जाते. स्वाभाविकपणे वसुली यंत्रणा संपूर्ण वर्षभर सजग असते. त्यामुळे अंतिम दिवसात येणारा प्रचंड लोड स्वरूपानंद मध्ये नसतो.

१७ ही ब्रँच आपापली वसुली २५ तारखेपर्यंत कशी पूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील असते. आज अखेरच १७ शाखांपैकी ६ शाखांची १००% वसुली पूर्ण झाली आहे.वर्ष अखेरीच्या दिवशी प्रत्येक शाखाधिकारी उत्साहाने त्यांच्या शाखेचा नफा, झालेला कर्ज व्यवहार, झालेली वसुली, जमा ठेवी यांचे विवरण देत असतो. प्रत्येक शाखा व्यवस्थापकाचे आर्थिक रिझल्ट हे गतवर्षीच्या तुलनेत सर्वच आघाड्यांवर अधिक उत्तम रिझल्ट असतात. वर्षभर केलेले योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी, संगणक प्रणालीच्या पूर्णांशाने उपयोग करत ठेवलेले अचूक रेकॉर्ड, समयबद्द पद्धतीने केलेले कामाचे वाटप आणि अंमलबजावणीचा घेतलेला परामर्श यामुळे संपूर्ण वर्षभर पूर्ण व्यवस्था सज्ज राहते आणि अंतिमतः उत्तम आर्थिक रिझल्ट येतात त्यातून वातावरण उत्सवी होते.

एकमेकांचे चांगले परफॉर्मन्स, त्यांच अभिनंदन असा सगळा कौतुकाचा सोहळा असतो.अर्थकारण हे पारदर्शी हव, विश्वासार्ह हवं तसच ते अचूक आणि वक्तशीर हवं. नव्या जमान्याला फार वेटिंग आवडत नाही. त्यामुळे ३१ मार्चला रिझल्ट घोषित करण ही माझ्या तरुणपणातली माझी हौस होती मात्र नव्या जमान्यात ती अनिवार्यता आहे ही अनिवार्यता स्वरूपानंदच्या व्यवस्थेत पूर्णांशाने भिनली असल्याने प्रत्येक ३१ मार्च हा स्वरूपानंदचा उत्सवी नव्हे महोत्सवी दिवस असतो. याही वर्षी उत्तम आकडे, उत्तम टक्केवारी जाहीर करण्यासाठी मन आतुरले आहे अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button