
रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य बंद करावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरेल; ठाकरे सेनेच्या नेत्या नेहा रवींद्र माने यांचा इशारा.
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा महिला आघाडीकडून जाहिर निषेध करण्यात येत आहे.यापुढे जर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवरील वक्तव्य बंद केले नाही तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्क संघटक नेहा रवींद्र माने यांनी दिला आहे.
त्या रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होत्या.नेहा माने म्हणाल्या की, दिशा सालियनचे वडील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यानंतर रामदास कदम यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्वाच्च शब्द वापरले आहेत.अशा पध्दतीचे वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा आम्ही निषेध करतो असे नेहा माने म्हणाल्या.शिवसेनेमुळे रामदास कदम यांना मोठी पदे मिळाली ते रामदास कदम आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देश सोडून जाण्याची वक्तव्य करत आहे.
अधिवेशन काळात साप साप म्हणून भुई धोपटून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा आम्ही महिला आघाडी निषेध करत आहोत. रामदास कदम यांनी यापुढे खालच्या पातळीवरील वक्तव्ये बंद केले नाही तर आम्ही महिला आघाडी रस्त्यावर उतरू असा इशारा नेहा माने यांनी दिला आहे.