
ना. उदय सामंत ह्यांनी दिली रत्नागिरी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासावर विस्तृत संवाद साधला.

त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आगामी विकास योजनांवर चर्चा केली.या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मामा मयेकर, बाबासाहेब परुळेकर, केदार साठे अन्य मान्यवर यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.