
रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकां कडून ६५ लाख ८० हजारचा भरणा.
रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजारचा भरणा केला. यामध्ये जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ हजार भरणा केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४७ ग्राहकांनी १२ लाख ९४ हजार रुपयांचा भरणा केलाविजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता.
या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी अभय योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजारचा भरणा केला. यामध्ये जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख ८६ हजार भरणा केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४७ ग्राहकांनी १२ लाख ९४ हजार रुपयांचा भरणा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागावापरासह विजेची गरज असो किंवा नसो; मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे.
अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.