
रत्नागिरी जिल्ह्यात सात वर्षांत ४६ जणांवर वन्यप्राण्यांचा हल्ला.
गेल्या सात वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी ४६ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला असून, ४१ जण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.मृतांच्या नातेवाइकांसह जखमींना आतापर्यंत १ कोटी ९ लाख ४० हजार १६३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
सह्याद्री खोऱ्यातील पातेपिलवलीतर्फे वेळंब, शेवरवाडी-नांदगाव, खानू-नवीवाडी व फुरूस (ता. दापोली), पन्हाळकाजी व ताडील (ता. दापोली), चिंचघर-खेड, तळसर-चिपळूण, चांदेराई व पाथरट (ता. रत्नागिरी), दोडवली-गुहागर, साखरपा-संगमेश्वर या ठिकाणी वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ले केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अजूनही वन्यप्राण्यांविषयी दहशत कायम आहे.बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नाहीबिबट्या, गवा, रानडुक्कर, अस्वल, माकड व काहीजण मगरीच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही; मात्र, रानगवा, रानडुक्कर व अस्वलाच्या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला