
दापोली तालुक्यातील करंजाणीत तरूणाची आत्महत्या
दापोलीः- दापोली तालुक्यातील करंजाणी येथे दि. 19 मार्च रोजी दु. 12 वाजण्याच्या सुमारास एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजाणी येथे साहिल संदीप पाडलेकर वय 26, रा. करंजाणी दापोली यांनी नैराशातून दि. 19 मार्च रोजी दु. 12 वाजण्याच्या दरम्यान घराच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली