
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून लढायला सज्ज व्हा, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन.
रत्नागिरी जिल्ह्यात पक्षांतर्गत असलेली नाराजीची होळी केलीत, याबद्दल तुमचे अभिनंदन पण आता आपण एवढ्यावरच थांबायचे नाही, पक्षातील हेवेदावे बाजूला ठेवून लढायला आपण सज्ज झाले पाहिजे. तुम्ही रडलात तर मी तुमचे अश्रू पुसेन, लढलात तर तुमच्या खांद्यावर हात ठेवेन, आपल्याला आता थांबायचे नाही. नवी झेप घ्यायची आहे, असे आवाहन कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सपकाळ बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, रूपाली सावंत तसेच कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सपकाळ यांनी सांगितले की, सर्वांना सोबत घेण्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. यावेळी रावणाचे उदाहरण देताना सपकाळ यांनी सांगितले की, रामाने रावणाच्या बेंबीत बाण मारल्यावर तो मृत्यूशय्येवर पडला. यावेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की, रावण जरी शत्रू असला तरी तो मोठा पंडित होता. त्याच्याकडे जा तुला शिकण्यासारखे बरेच मिळेल. शत्रूकडूनही शिकण्याची आपली भारतीय परंपरा आहे.www.konkantoday.com