
दापोली सिनिअर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक
दापोली सिनिअर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात २ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार १६ सप्टेम्बर ते २१ डिसेंबर या कालावधीत धीरज अग्रवाल व विकास प्रभू यांनी संगनमत करून व खोटी माहिती देवून प्राचार्य संदेश जगदाळे यांना विविध वस्तू देतो असे सांगून विविध बँकेतील खात्यात डॉ. जगदाळे यांना पैसे भरायला लावले.
जगदाळे यांनी सुमारे ८ लाख ८८ हजार ४२६ रुपये भरलेही मात्र त्यांना या दोन संशयितांनी कबुल केलेल्या कोणत्याही वस्तू दिल्या नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे जगदाळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयीता विरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.