
मालवणात भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या परप्रांतीयांच्या अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा बुलडोजर फिरला
मालवणात भारताच्या विरोधात घोषणा देणाऱ्या परप्रांतीयांच्या घोषणांमुळे मालवणात असंतोष उफाळला होता या प्रकरणी दोन परप्रांतीय भंगारवाल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते दरम्याने या प्रकरणात निलेश राणे यांनी लक्ष घातले
चॅम्पियन ट्रॉपीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विराट विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. मालवण आडवणं येथील काही परप्रांतीय भंगार व्यवसाइकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या याचे पडसाद आज दिवसभरात मालवणात उमटले या घोषणा परप्रांतीय भंगारवाल्यांकडून देण्यात आले होत्या त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.या घटनेची तात्काळ दखल घेत आमदार निलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्यांच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे पत्र मालवण नगरपालिका प्रशासनाला दिले.
यावर नगरपालिका प्रशासनाने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत बुलडोझर फिरवण्यात आला. सदरचे बांधकाम जमीनदोस्त केले. या प्रसंगी उपस्थितांकडून भारत माता की जय…च्या घोषणा दिल्या गेल्या.