पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही – माजी मंत्री रविंद्र माने.

आज शिवसेना नेते तथा मा.खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा कार्यकारणी बैठक मा.खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात माजी मंत्री श्री रविंद्रजी माने व प्रभारी जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये संघटना वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे.

कार्यकर्त्यांनी आपआपसातले मतभेद विसरुन संघटना उभारणीसाठी प्रयत्न करावेत पुन्हा एकदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी मंत्री रविंद्र माने यांनी व्यक्त केला. पक्षाची सदस्य नोंदणीकडे गांभिर्याने लक्ष देवून मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी होईल याकडे लक्ष द्यावे. आणि संघटनेतील रिक्त असलेली पदे याचा आढावा घेवून वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांच्या नेमणूकाबाबत कारवाई करण्यात येईल. विरोधकांकडून उठवण्यात येणाऱ्या अफवा, वावड्या याकडे लक्ष न देता परस्परांवरील असलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता सर्व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी.

दर महिन्यातून अशाच प्रकारे जिल्हा कार्यकारणी व अंगीकृत असलेल्या संघटनांच्या बैठका होवून आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रभारी जिल्हाप्रमुख श्री दत्तात्रय कदम, उपजिल्हासंघटक सौ उल्का विश्वासराव, लांजा तालुकाप्रमुख श्री सुरेश करंबेळे, रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे यांचा जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीला उपस्थित लोकसभा महिला संपर्क संघटक सौ.नेहा माने, जिल्हा समन्वयक श्री रविंद्र डोळस, श्री मंगेश शिंदे, श्री संजय पुनसकर, जिल्हा संघटक सौ.वेदा फडके, जिल्हासंघटक शिव सहकार सेना श्री चंद्रकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख श्री प्रतापराव शिंदे, उपजिल्हा संघटक श्री सुजित कीर, उपजिल्हा संघटक सौ.धनश्री शिंदे, सौ.ममता जोशी, सौ.उल्का विश्वासराव, ऐश्वर्या घोसाळकर, विधानसभा क्षेत्र संघटक सौ.सायली पवार, रुमा देवळेकर, तालुकाप्रमुख श्री कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, शेखर घोसाळे, नंददिप उर्फ बंड्या बोरुकर, विनोद झगडे तालुका संघटक श्री संतोष थेराडे, शहरप्रमुख श्री प्रशांत साळुंखे, संजय पवार, शशिकांत मोदी, तालुका संघटक सौ.प्राची शिर्के, पूर्वा मुळ्ये, महिला शहर संघटक सौ.निलम हेगशेट्ये युवासेना उपजिल्हा अधिकारी श्री संतोष हातणकर, तालुका युवाधिकारी श्री तेजस शिंदे, प्रसाद सावंत, शहर युवाधिकारी श्री पार्थ जागुष्टे, मा.सभापती पं.स.अजित गवाणकर, मा.पं.स.सदस्या सौ. शितल करंबेळे, तालुका सचिव प्रसाद लाड, शहर सचिव प्रशांत मुळ्ये व सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, मा.नगरसेवक, युवासेना महिला आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button