
रत्नागिरी जिल्ह्यातील खून प्रकरणात जन्मठेप भोगताना पॅरोलवर सुटलेल्या आरोपी फाईक करंबेकरकडे सापडल्या पिस्टल.
रत्नागिरी जिल्ह्यातील खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या फाईक मुश्ताक कळंबेकर (४६, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) हा तुरूंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यापूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा जेलमध्ये हजर झाला नव्हता.कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेल्या निंगोडा बिराजदार याने फाईकची राहण्याची सोय मंगळवेढ्यातील शेतात केली. सोलापूर ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद केले असून त्याच्याकडे एक पिस्टल व पाच जीवंत काडतुस सापडले आहे.
खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेला फाईक कळंबेकर याच्या ओळखीच्या निंगोडा हणुमंत बिराजदार याने फाईकला त्याच्या शेतात पत्राशेड करून राहण्याची सोय केली होती. त्याची खबर ग्रामीण पोलिसांना लागली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला पकडण्यासाठी पहाटेच्या सुमारास सापळा लावला. तो सतत पिस्टल लोड करून वावरत असल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कोणतीही घाई केली नाही. त्याला बेसावध असताना पकडले. त्यावेळी त्याच्याकडे पिस्टल व पाच जीवंत काडतुस सापडले.www.konkantoday.com