एपीएमसीत यंदाच्या हंगामात कोकणातील १७५पेट्या दाखल


वाशीच्या एपीएमसी बाजारात शनिवारी कोकणातील हापूस आंब्याच्या तब्बल १७५ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत . गेल्या काही दिवसांपासून बाजारात तुरळक पेट्या दाखल होत होत्या.शनिवारी यंदाच्या हंगामातील हापूसची अधिक आवक झाली आहे. बाजारात आंब्याची ही आतापर्यंतची चांगली आवक आहे . यावर्षी हापुसचे उत्पादन चांगले असेल, मात्र हंगामाला उशिराने सुरुवात होईल असे मत हापूस बागायतदार यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी हापूस आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो. यंदा हवामान बदल, कडाक्याची थंडी यामुळे सुरुवातीचा मोहोरला फाळधारणा झाली नाही तर काही मोहोर गळून पडला. थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावाचा ही फटका बसला त्यामुळे, औषधीफवारणी खर्च वाढला. त्यामुळे बाजारात सध्या फेब्रुवारी महिना उजडला तरी हापूसची आवक कमी होत आहे. त्यामुळे खवय्यांना हापूसची चव चाखण्यासाठी १५ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button