
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर वडील फोनवर बोलण्यात व्यस्त, 3 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू.
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर माघारी परतण्यापूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.व्योम जयेश राऊत (वय ०३, रा. वाशी, मुंबई) असे स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. राऊत कुटुंबीय मुंबईतून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. पर्यटन उरकून मुंबईला परत जाण्यापूर्वी तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, व्योम आणि त्याचे वडील व्हिलाच्या बाहेर होते.
वडील फोनवर बोलत असताना व्योम वडिलांचा हात सोडून जलतरण तलावाच्या दिशेने गेला आणि तलावात पडलाफोनवरील संभाषण संपल्यानंतर वडिलांना मुलाचा शोध घेतला असता मुलगा पुलात पडल्याचे दिसून आले. वडिलांना तात्काळ मुलाला घेऊन वैद्यकीय रुग्णालय गाठले. दरम्यान, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.